स्टोबार्ट एर ही १९७० ते २०२१ दरम्यान काम करणारी एक आयरिश प्रादेशिक विमानकंपनी होती. डब्लिन येथे मुख्यालय असलेली ही कंपनी एर लिंगस रिजनल, बीए सिटीफ्लायर आणि केएलएम सिटीहॉपर या नावांखाली नियोजित विमानसेवा चालवत असे. स्टोबार्ट एरचे एर लिंगस रिजनलसाठी कॉर्क, डब्लिन आणि बेल्फास्ट येथे ठाणी होते.
या विमानकंपनीची सुरुवात १९७० मध्ये एर अरान म्हणून झाली, जी गॅलोवे ते अरान बेटांपर्यंत सेवा पुरवत असे. १९९० च्या दशकात तिचे रूपांतर एका प्रादेशिक विमानकंपनीमध्ये झाल्यावर तिने एर अरान रिजनल हे नाव घेतले. २०१४ मधील एर अरान बंद पडल्यावर नवीन मालकांनी या कंपनीचे नाव बदलून स्टोबार्ट एर केले.
जून २०२१ मध्ये स्टोबार्ट एर दिवाळखोरी जाहीर केली व कंपनी बंद पडली.
स्टोबार्ट एर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.