सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष

सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष (रशियन: Коммунистическая партия Советского Союза) हा सोव्हिएत संघ ह्या भूतपूर्व देशामधील एकमेव राजकीय पक्ष होता. १ जानेवारी १९१२ रोजी व्लादिमिर लेनिनने ह्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. २९ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत संघाच्या विघटनादरम्यान कम्युनिस्ट पक्ष बरखास्त करण्यात आला.

कार्ल मार्क्स व लेनिन ह्यांच्या विचारवादावर आधारित असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघाच्या जवळजवळ सर्व अस्तित्वादरम्यान देशावर संपूर्ण नियंत्रण होते. नियमानुसार पक्षाचा सरचिटणीस सोव्हिएत संघाचा सरकारप्रमुख व राष्ट्रप्रमुख ह्या पदांवर आपोआप नियुक्त होत असे.

१९८८ सालच्या मिखाईल गोर्बाचेवने आणलेल्या अनेक धोरणांमुळे कम्युनिस्ट पक्षाचा एकछत्री अंमल कमी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →