मिखाइल गोर्बाचेव

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मिखाइल गोर्बाचेव

मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव (रशियन: Михаи́л Серге́евич Горбачёв; २ मार्च, १९३१ - ३० ऑगस्ट, २०२२) हे एक माजी सोव्हिएत राजकारणी होते. हे सोव्हिएत संघाचा सातवे व अखेरचे राष्ट्रप्रमुख होते. मार्च १९८५ ते ऑगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होते.

१९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच तो पक्षात कार्यशील झाला. १९७९ साली कार्यकारी समितीचा (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेला गोर्बाचेव लिओनिद ब्रेझनेवच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस व सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख झाला. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेवने परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनररचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेवने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →