बहुजन समाज पक्ष

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बहुजन समाज पक्ष

बहुजन समाज पक्ष (मराठी नामभेद: बहुजन समाज पार्टी ; लघुरूप: ब.स.प.) हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जागा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता.



या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →