सोमनाथ वाघमारे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सोमनाथ वाघमारे

सोमनाथ वाघमारे हे एक भारतीय लघुपट माहितीपट निर्माते आहेत. ते महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि अगदी अलीकडील चित्रपट, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी होता, ज्याची समीक्षा भारत व परदेशात झाली. आत्तापर्यंत त्यांचे सर्व चित्रपट डॉक्युमेंटरी चित्रपट होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा छळ आणि दलित उत्पिडन यासारख्या विविध सामाजिक समस्यांना चित्रपटांत मांडले आहे. आय एम नॉट अ विच (२०१७) या लघुपट माहितीपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा आगामी चित्रपट म्हणजे चैत्यभूमी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ आणि दलित अस्मितेचे प्रतीक आहे) आणि गेल एंड भरत हे होय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →