सोप्पादंडी यशश्री

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सोप्पादंडी वेणुगोपाल यशश्री (४ सप्टेंबर, २००३:हैदराबाद, तेलंगणा, भारत - ) ही हैदराबादकडून क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. ही महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळते. यशश्री उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

यशश्रीला डिसेंबर २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात आणि २०२३ च्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. नंतर दुखापतीमुळे तिने हर्ली गालाची जागा घेतली.

फेब्रुवारी २०२३ मध्ये, तिला यूपी वॉरियर्सने महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी ₹१० लाख किमतीला करारबद्ध केले. जून २०२३ मध्ये, यशश्रीला महिला टी२० इमर्जिंग टीम्स आशिया कपसाठी इंडिया अ संघात स्थान देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →