सेदान हे ईशान्य फ्रांसमधील आर्देन्स प्रांतातील एक छोटे शहर आहे. म्यूझ नदीकाठी वसलेले हे शहर सेदान अराँदिसमाँचे प्रशासकीय केन्द्र आहे.
हे शहर पॅरिसपासून २०० किमी अंतरावर असून बेल्जियमच्या सीमेपासून १० किमी दक्षिणेस आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान चार वर्षे जर्मनीने या शहरावर ताबा ठेवला होता.
या शहराची स्थापना १४२४मध्ये झाली. २०१७ च्या सुरुवातीस येथील लोकसंख्या १६,४२८ होती
सेदान (फ्रान्स)
थोडक्यात पण महत्त्वाचे.