सेंत-देनिस

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सेंत-देनिस

सेंत-देनिस (फ्रेंच: Saint-Denis) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस महानगरामधील एक शहर आहे. हे शहर पॅरिसच्या ९.४ किमी उत्तरेस इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या सीन-सेंत-देनिस विभागात वसले आहे.

१.०५ लाख लोकसंख्या असलेले सेंत-देनिस येथील स्ताद दा फ्रान्स ह्या स्टेडियमसाठी प्रसिद्ध आहे. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →