इल-दा-फ्रान्स (फ्रेंच: Île-de-France; शब्दशः अर्थ: फ्रान्सचे बेट) हा फ्रान्स देशाच्या २२ प्रदेशांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशात मुख्यतः राजधानी पॅरिस महानगर क्षेत्राचा समावेश होतो. सुमारे १.१७ कोटी लोकसंख्या असलेला इल-दा-फ्रान्स हा युरोपातील चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रशासकीय विभाग आहे (इंग्लंड, नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन व बायर्न) खालोखाल. आर्थिक दृष्ट्या इल-दा-फ्रान्स जगातील चौथ्या तर युरोपातील अव्वल क्रमांकाचा धनाढ्य प्रदेश आहे. २००९ साली इल-दा-फ्रान्सचा जीडीपी ५५२ अब्ज युरो इतका होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इल-दा-फ्रान्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.