युएफा यूरो २०१६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची १५वी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १० जुलै, इ.स. २०१६ दरम्यान खेळवली गेली. ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच १६ ऐवजी २४ संघांना सामील करून घेतले गेले. दोनवेळचा गतविजेता स्पेन बाद फेरीच्या पहिल्याच पातळीमध्ये पराभूत झाला. १० जुलै रोजी स्ताद दा फ्रान्समध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रान्सचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करून आपली पहिलीवाहिली युरो स्पर्धा जिंकली. ह्या विजयाद्वारे पोर्तुगालने २०१७ सालच्या रशियामधील फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी थेट पात्रता मिळवली.
२८ मे २०१० रोजी फ्रान्सची ह्या स्पर्धेच्या यजमानपदी निवड झाली. इटली व तुर्कस्तान हे देश देखील ह्यासाठी उत्सुक होते. परंतु सर्वाधिक मते मिळवून फ्रान्सने यजमानपदाची शर्यत जिंकली. युरो स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजीत होण्याची ही तिसरी वेळ होती. ह्या स्पर्धेसाठी बोर्दू, लेंस, लील, ल्यों, मार्सेल, नीस, पॅरिस, सेंत-देनिस, सेंत-एत्येन, व तुलूझ ह्या १० यजमान शहरांमधील फुटबॉलची १० स्टेडियमे वापरली गेली.
युएफा यूरो २०१६
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.