पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDG, आप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिस व व्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चार्ल्स दि गॉल विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.