सेंट लॉरेन्स नदी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सेंट लॉरेन्स नदी

सेंट लॉरेन्स नदी (इंग्लिश: Saint Lawrence River; फ्रेंच: fleuve Saint-Laurent) ही उत्तर अमेरिकेतील ऑन्टारियो ह्या भव्य सरोवराला अटलांटिक महासागरासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.

जलविद्युतनिर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून सुपिरियर सरोवरापर्यंत जलप्रवास शक्य आहे.

इ.स. १५३४ साली येथे पोचलेला फ्रेंच शोधक जॉक कार्तिये हा पहिला युरोपीय मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →