सेंट लुसिया (इंग्लिश: Saint Lucia; फ्रेंच: Sainte-Lucie) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. सेंट लुसिया पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस मार्टिनिक, दक्षिणेस सेंट व्हिन्सेंट तर आग्नेयेस बार्बाडोस ही बेटे आहेत. कॅस्ट्रीझ ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
इ.स. १६६० साली येथे फ्रेंच दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व इंग्लंडने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. जॉन कॉम्प्टन हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. सध्या सेंट लुसिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे.
सेंट लुसिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.