सूर्यापेट जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. सूर्यापेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सूर्यापेट जिल्हा हा पूर्वीच्या नालगोंडा जिल्ह्यापासून बनलेला आहे.
सूर्यापेट हे ऐतिहासिकदृष्ट्या तेलंगणा सशस्त्र संघर्षातील रझाकारांविरुद्धच्या चळवळीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. सूर्यपेट हा आता वेगाने विकसित होत असलेला सिमेंट उद्योग असलेला प्रदेश आहे. कृष्णा नदीचे खोरे विस्तीर्ण पसरलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती आहे तर नागार्जुन सागराचा डावा कालवा हा सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. सूर्यापेट हे अनेक शिव मंदिरांनी सुशोभित केलेले आहे जे काकतीय राजवटीत बांधले गेले होते आणि प्रत्येकाला या परिसराच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात.
सूर्यापेट जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.