सुहासिनी कोरटकर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डॉ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर इ.स. १९४४; - पुणे, ७ नोव्हेंबर इ.स. २०१७) या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला. त्या अविवाहित होत्या.

सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. शिस्तबद्ध तालीम, गुरूंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वतःची निरंतर साधना यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी ही त्यांनी यशस्वीपणे आत्मसात केली.

डॉ. सुहासिनी कोरटकर या पुणे आकाशवाणी केंद्रात काम संगीत अधिकारी म्हणून करत. त्यावेळी त्यांनी मोनो रेकॉर्डिंग तंत्राची माहिती करून घेतली होती. मोठमोठ्या वाद्यवृंदाच्या वादनाचे ध्वनिमुद्रण त्या स्वतः करीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →