सुशीलकुमार संभाजीराव शिंदे (सप्टेंबर ४, इ.स. १९४१; सोलापूर, महाराष्ट्र) हे भारतीय मराठी राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री होते.
लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते १ले महाराष्ट्रीय नेते आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडला.
सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते आहेत.
सुशीलकुमार शिंदे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!