सुलेमानी चहा

या विषयावर तज्ञ बना.

सुलेमानी तथा लेबु चहा हा कोलकात्यामध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे.

ब्रिटिश लोकांनी प्रथम कोलकत्यात चहापिण्याची सवय आणली. हल्लीसुद्धा कोलकात्यात स्थानिक बिस्किटाबरोबर लेबु चहा घेऊनच सकाळची सुरुवात करतात. चहाचा मसाला हा प्रत्येक दुकानात खास असतो. उत्तर कोलकत्यात नेशनल इकॉनॉमिक रेस्टॉरंट जे १९२० सालापासून कार्यरत आहे ते ह्या चहासाठी प्रसिद्ध आहे. सुभाशिष बसाक जे आज त्या रेस्टॉरंटचे मालक आहेत ते सांगतात की जहारलाल बसाक ह्या त्यांच्या आजोबांनी दुकान सुरू केले. १९७० नंतर लेबु चहाची लोकप्रियता वाढली. प्रत्येक मोसमात हा चहा पितात आणि चहामुळे सर्दी, खोकला आणि अपचनाचा त्रास होत नाही. चहाची चव ही लिंबू प्रकारावर अवलंबून असते. गंधराज किंवा पाटी लिंबू वापरले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →