चॉकलेट चहा हा चहा उटी मध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे. पश्चिम घाटातील निलगिरीच्या उंच पर्वतरांगांमध्ये होणारा हा चहा गडद आणि अत्यंत सुवासिक असतो. ह्या चहात कोका पावडर टाकून योग्य मिश्रण केल्यावर एक आगळी चव असलेला चहा बनतो. कोइंबतूर मधील चहा दुकानदार निर्मलराज म्हणतात कोइंबतूर आणि उटी मधील लहान मुलांचा पहिला चहा हा चॉकलेट चहा असतो. चॉकलेट चहाची चव जिभेवर रुळली की ते नेहमीच्या चहाकडे वळतात. मंद सुगंध हा हवाहवासा वाटणारा चॉकलेट चहाचा गुण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चॉकलेट चहा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.