डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे सुप्रसिद्ध लेखक,कवी,स्तंभलेखक,पत्रकार,प्रवचनकार,सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित नुकताच पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन भूषविले. सम्यक बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष तर,महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभागी महाराष्ट्र शासनाच्या वैदयकिय अधिकारी या पदाचा त्याग करून आरोग्य चिकित्सा सोडुन सामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्र आपल्या लेखणीच्या साहयाने स्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भुमीका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही.
धम्म सारथी या वेबसाइट वरून वे ऑफ लाइफ या अंतर्गत संपुर्ण जगातील 125 देशात बौद्ध धम्मावर,तथागत गौतम बुद्धांवर तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर उपरोक्त असे १२५ ते १५० लेख प्रकाशीत व प्रसारीत झालेले आहेत.आंबेडकरी कवींचा आंबेडकरी अविष्कार म्हणुन सम्मासम्बुद्ध साहित्य विचार मंचाने स्मिता पब्लिकेशनद्वारे ‘नव्हती कोणाची हिम्मत’ ही कवीता प्रसीद्ध होवुन वर्ल्ड बुक ऑफ गीनीज मध्ये या कवीतेची नोंद झाली. अनेक प्रबोधनात्मक, ज्ञानदानात्मक तसेच विविधांगी माहितीपर लेख लिहुन वृत्तपत्रातुन प्रकाशीत होवुन सामाजिक प्रबोधन या लेखांद्वारे करण्यात यश संपादन. वास्तववादी साहित्यिक,कवि,लेखक,पत्रकार म्हणुन कार्यरत आत्तापर्यंत 120 च्या वर वास्तववादी कवीता करून अनेक कविसंमेलनात कवीता सादर करून काही कवीता वृत्तपत्रातुनही प्रकाशीत झालेल्या आहेत.
सम्यक बहुउद्येशिय सामाजिक विकास संस्था या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष म्हणुन कार्यरत बौद्ध विकास मंडळाचा व नालंदा बुद्ध विहाराचा क्रियाशील सभासद, सिद्धार्थ पंचशील विकास मंडळ व शांतीदुत बुद्ध विहाराचा माजी अध्यक्ष, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचा सहसचिव, पुरोगामी पत्रकार संघाचा सचिव, तर पुरोगामी बहुउद्येशीय सामाजिक संस्थेचा सचिव,मैत्रेय वैदयकिय सेवाभावी संस्थेचा सचिव,टेक्नोबाईट एज्युकेषन सोसायटीचा खजिनदार, महाराश्ट्रातील अनेक संस्थेवर सल्लागार म्हणुन कार्यरत असुन दै.वृत्तरत्नसम्राट,दै.विष्वपथ,दै.नवनगर,दै.कोकणसकाळ,दै.पुढारी तसेच प्रबुद्ध भारत या संपुर्ण महाराश्ट्रात जाणा-या व नावाजलेल्या वृत्तपत्रात अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार व स्तंभलेखनाद्वारे करून आशरामुक्तांगण या हिंदी साप्ताहिकाचा उपसंपादक,तसेच अनेक साप्ताहिकांमध्ये पत्रकारीता/स्तंभलेखक म्हणुन कार्यरत. सामाजिक कार्याची चमक म्हणून वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे येथील रहिवासीयांना नागरी मूलभूत सुविधा प्राप्त होण्यासाठी उपोषणाद्वारे जनजागृती आंदोलन करून नागरी मूलभूत सुविधा मिळवून दिल्या. बौद्ध समाजाच्या महारवतनी जमिनीबाबत पुणे येथे तीव्र जनजागृती आंदोलन सुरू केले. कळवा येथे शांतिदूत बुद्धविहार वाचविण्यासाठी प्रयत्न्नांची पराकाष्ठा करून ठाणे कॉर्पोरेशन ते मंत्रालय असा पत्रव्यव्हार करून जनआंदोलन करून शांतिदूत बुद्धविहार वाचविण्यात यश मिळविले- शास्त्री नगर कळवा येथील झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळवण्याकामी ठाणे मनपा आयुक्त ते ठाणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि मंत्रालय असे पत्रव्यवहार करून,जनआंदोलन करून धर्मवीर नगर ठाणे येथे त्यांना त्यांची हक्काची घरे मिळवून दिले- विश्वकर्मा नगर कळवा वाचविण्यात आणि घडविण्यात सिंहाचा वाटा त्यामुळेच अनेकांचा रोष पत्करून आजही विश्वकर्मा नगर आणि तेथील शांतिदूत बुद्धविहार गुण्यागोविंदाने उभे आहे उपरोक्त कार्यानेच तसेच महाराष्ट्रातील अनेक संस्थेवर कार्यान्वित असल्याने आणि पत्रकारिकतेतील उत्कृष्ठ योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सुरेंद्र राजाराम शिंदे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.