बबन कांबळे (संपादक)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बबन कांबळे (संपादक)

बबन कांबळे मराठी संपादक, पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डावरी गावी शेतमजूर कुटुंबात झाला.भारत हा प्राचीन संस्कृती, धार्मिक मूल्ये, लोकपरंपरा आणि भौगोलिक वैविध्याने नटलेला देश आहे. तथापि, इतिहासभर अनेक समाज घटक उपेक्षित राहिले आहेत., मागासवर्गीय, बहुजन , वंचित,उपेक्षित,आदिवासी, विमुक्त समाज, महिला आणि गरीब शेतकरी यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, न्याय आणि आर्थिक संसाधने मिळवणे नेहमीच आव्हानपूर्ण राहिले आहे.अशा परिस्थितीत सामाजिक जागृती आणि समाजसुधारणेसाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पत्रकारितेने सत्याची आणि न्यायाची देवाणघेवाण करून समाजाच्या उपेक्षित घटकांसाठी आवाज निर्माण केला पाहिजे. या पार्श्वभूमीवर उभे राहते प्रेरणादायी व्यक्तिमत्व बबनराव कांबळे, जे पूर्वी दैनिक नवाकाळमध्ये पत्रकार होते. नवाकाळमध्ये अनुभवलेल्या अन्याय, दलित व बहुजन समाजावरील उपेक्षा, स्त्री आणि शेतकरी वर्गावरील अन्याय यामुळे त्यांचा स्वाभिमान जागृत झाला. त्यांनी ठरवले की पत्रकारितेचा उपयोग उपेक्षित समाजाला जागृत करणे, अन्याय- अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे आणि लोकांच्या ज्ञान, कृती आणि वृत्तीत आमूलाग्र बदल घडवणे या उद्देशासाठी होईल.त्यानंतर त्यांनी सुरू केलेले दैनिक वृत्तरत्न सम्राट उपेक्षित वर्गाच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणारे माध्यम ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →