सुभाष घई

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सुभाष घई

सुभाष घई ( जानेवारी २४, इ.स. १९४५) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहे. त्याने इ.स. १९८२ साली मुक्ता आर्ट्स नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापली. त्याने निर्मिलेल्या चित्रपटांतील कर्ज (इ.स. १९८०), हीरो (इ.स. १९८३), मेरी जंग (इ.स. १९८५), राम लखन (इ.स. १९८९), सौदागर (इ.स. १९९१), खलनायक (इ.स. १९९३), परदेस (इ.स. १९९७) व ताल (इ.स. १९९९) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्याला १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →