मनीषा कोइराला

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मनीषा कोइराला

मनीषा कोइराला (१६ ऑगस्ट, इ.स. १९७०; काठमांडू, नेपाळ - हयात) ही नेपाळी-भारतीय चित्रपट-अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच ती भरतनाट्यम् व मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे.

तिने इ.स. १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. इ.स. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२: अ लव्ह स्टोरी, बॉंबे, खामोशी: द म्यूझिकल व दिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →