करीना कपूर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

करीना कपूर

करीना कपूर (सप्टेंबर २१, इ.स. १९८०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही हिंदी चित्रपटांतील भारतीय अभिनेत्री आहे. ती अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर ची धाकटी बहीण आहे. रोमँटिक कॉमेडीपासून क्राइम ड्रामापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपट शैलींमध्ये विविध पात्रे साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

करिनाला सहा फिल्म फेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती हिंदी चित्रपट सृष्टी तील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रोमँटिक विनोदी चित्रपट जब वी मेट (२००७) आणि एक मैं और एक तू (२०१२), थ्रिलर्स कुर्बान (२००९) आणि तलाश: द आन्सर लाइज विदिन (२०१२), हिरोईन (२०१२) आणि उडता पंजाब (२०१६). आणि वी आर फॅमिली (२०१२) यांमधील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. सिंघम रिटर्न्स (२०१४), गुड न्यूझ (२०१९), आणि ३ इडियट्स (२००९), बॉडीगार्ड (२०११) आणि बजरंगी भाईजान (२०१५) यांचा समावेश तिच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आहे.

अभिनेता सैफ अली खानशी तिचे लग्न झाले आणि त्यांना दोन मुलगे आहेत. करिना कपूरचे ऑफ-स्क्रीन जीवन भारतात व्यापक चर्चेचा विषय आहे. तिचा स्पष्टवक्तपणा आणि खंबीरपणा यासाठी ती प्रसिद्ध आहे. तसेच तिच्या फॅशन शैली आणि चित्रपटातील भूमिकांद्वारे चित्रपट उद्योगातील तिच्या योगदानासाठी ओळखली जाते.

चित्रपट अभिनयाव्यतिरिक्त करिना स्टेज शोमध्ये भाग घेते, रेडिओ शो होस्ट करते आणि तिने चार पुस्तकांसाठी सह-लेखक म्हणून योगदान दिले आहे. त्यापैकी दोन आत्मचरित्रात्मक संस्मरण आणि दोन पोषण मार्गदर्शक आहेत. तिने महिलांसाठी कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांची स्वतःची लाइन सुरू केली आहे आणि २०१४ पासून युनिसेफसोबत मुलींच्या शिक्षणासाठी आणि भारतात गुणवत्ता आधारित शिक्षणात वाढ करण्यासाठी काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →