सुनेत्रा पवार (१८ ऑक्टोबर, १९६३:धाराशिव, महाराष्ट्र, भारत - ) या महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत. त्या २०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत.
सुनेत्रा पवार बारामती टेक्सटाईल कंपनीच्या चेरपर्सन आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या मुख्याधिकारी आहेत. त्यांना जय पवार आणि पार्थ पवार ही दोन मुले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या बारामतीमधून लोकसभेच्या उमेदवार होत्या.
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पदमसिंह पाटील हे त्यांचे भाऊ आहेत.
सुनेत्रा पवार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.