राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) (संक्षिप्त.राशप-NSP) हा भारतातील राजकीय पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित आहे. त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख राज्ये महाराष्ट्र आणि केरळ आहेत. या पक्षाचे चिन्ह "तुतारी फुंकणारा भोई" आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील प्रमुख अजित पवार हे पक्ष फोडून ३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. ते शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत युती सरकारमध्ये सामील झाले. भारताच्या निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नांव दिले व चिन्ह म्हणून नवीन चिन्ह तुतारी वाजवणार भोई(माणूस) राज्यसभेच्या निवडणुकीनंतरच्या अपिलावर मान्य केले. या नवीन पक्षाची स्थापना ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.