सुधा मूर्ती

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सुधा मूर्ती

सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुळकर्णी आणि डॉ. आर.एच .कुळकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →