इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (बीएसई.: 500209, एनएसई.: INFY) ही एन्.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात १९८१मध्ये स्थापलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. १९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत.
इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). २००६-२००७ सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज अमेरिकन डॉलरांपेक्षा जास्त होते.
इन्फोसिस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.