कामसूत्र कंडोम (इंग्रजी: KamaSutra Condoms) हा भारतातील दुसरा सर्वात मोठा कंडोमचा ब्रँड आहे. याचे उत्पादन जे.के. अँन्सेल लिमिटेड (JKAL) कडून होते. या कंपनीमध्ये भारतातील सर्वात मोठा फॅब्रिक आणि ब्रँडेड वस्त्रनिर्माण उद्योग असलेला रेमंड ग्रुप आणि अँसेंल लिमिटेड यांची ५०:५० भागीदारी आहे.
JKALचे एक कंडोम उत्पादन युनिट महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथे आहे ज्याची उत्पादन क्षमता वार्षिक ३५० दशलक्ष आहे. JKAL ने १९९१ मध्ये एक मोहीम सुरू केली आणि त्याच वर्षी कामसूत्र कंडोम बाजारात आणले. हा उद्योग १९९६ मध्ये संयुक्त उपक्रम स्थापन होण्यापूर्वी, रेमंड ग्रुपची उपकंपनी असलेल्या जे.के. केमिकल्सच्या कंडोम विभागाचा एक घटक होता.
कामसूत्र कंडोममध्ये टेक्सचर्ड आणि इतर विशेष कंडोमचे प्रकार उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये डॉटेड, रिब्ड, कॉन्टूर्ड, लाँगलास्ट, सुपरथिन, इंटेन्सिटी (मल्टी-टेक्श्चर), स्मूथ (साधा, अतिरिक्त स्नेहवर्धक), अतिरिक्त मोठे, फ्लेर्ड आणि फ्लेवर्ड/सुगंधी कंडोम यांचा समावेश होतो.
कामसूत्र (निरोध)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.