सुखोई एसयू-३० हे भारतीय वायुसेनेतील एक लढाऊ विमान आहे. हे एक बहुउद्देशी, दोन आसनी व दोन इंजिने असणारे लढाऊ विमान आहे. याची रचना रशियाच्या सुखोई एव्हिएशन कॉर्पोरेशनने केलेली आहे. हे विमान सर्व प्रकारच्या हवामानात काम करू शकते. या विमानाची, हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची व डागण्याची क्षमता आहे.
याचे पहिले उड्डाण ३१ डिसेंबर १९८९ला झाले व १९९६मध्ये रशियाच्या हवाईदलात ते समाविष्ट झाले.
सुखोई एसयू-३०
थोडक्यात पण महत्त्वाचे.