एफ-१६ फायटिंग फाल्कन हे अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या जनरल डायनामिक्स या कंपनीने अमेरिकेच्या वायुसेनेसाठी बनवले होते. सुरुवातीला दिवसा लढण्यासाठी प्रमुख लढाऊ विमान म्हणून याला बनवले गेले होते. पण सततच्या सुधारणा आणि तांत्रिक विकासामुळे हे विमान सर्व प्रकारच्या वातावरणात लढण्यासाठी सक्षम आणि यशस्वी बहूद्देशीय लढाऊ विमान बनले. १९७६ पासून आजपर्यंत ४,५०० पेक्षा जास्त एफ-१६ विमाने वेगवेगळ्या देशांसाठी बनवण्यात आली आणि त्यातली बरीचशी अजुनही सेवेत कार्यरत आहेत. अमेरिकन वायुसेना आता ही विमाने खरेदी करत नाही आणि त्यांच्या ताफ्यातील जुन्या एफ-१६ विमानांना इतर विमानांनी बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण विदेशी वायुसेनांना या विमानाच्या सुधारीत आवृत्त्या अजूनही विकल्या जातात.
भारतीय वायुसेनेसाठीच्या मध्यम बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या स्पर्धेमध्ये (एम.एम.आर.सी.ए.) लॉकहीड मार्टिनने एफ-१६आयएन सुपर व्हायपर देऊ केले होते. ती स्पर्धा फ्रान्सच्या रफल विमानाने जिंकली.
जनरल डायनॅमिक्स एफ-१६ फायटिंग फाल्कन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!