सुखविंदर सिंग ( १८ जुलै १९७१) हा एक भारतीय गायक आहे. १९९८ सालच्या दिल से ह्या चित्रपटामधील छैया छैया ह्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुखविंदर सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २ वेळा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
२००८ मधील स्लमडॉग मिलियोनेर ह्या ब्रिटिश चित्रपटामधील जय हो हे सुखविंदर् सिंगने म्हटलेले गाणे देखील लोकप्रिय झाले.
सुखविंदर सिंग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.