सीमा बिस्वास (जन्म १४ जानेवारी १९६५) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत ज्या हिंदी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करतात. शेखर कपूरच्या बॅन्डिट क्वीन (१९९४) या चित्रपटात फुलन देवीची भूमिका साकारल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. १९९९-२००० साली त्यांच्या नाटकांमधील कामासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. दीपा मेहताच्या वॉटर (२००५) मधील शकुंतलाच्या भूमिकेसाठी त्यांना २००६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जीनी पुरस्कार मिळाला जो कॅनेडियन सिनेमा आणि टेलिव्हिजन अकादमी सादर करते. त्यांच्या इतर मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये खामोशी: द म्युझिकल (१९९६), भूत (२००३), विवाह (२००६) आणि हाफ गर्लफ्रेंड (२०१७) हे आहे. खामोशी चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन पुरस्कार जिंकला. चित्रपटांव्यतिरिक्त, बिस्वास अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीमा बिस्वास
थोडक्यात पण महत्त्वाचे.