सीम रिप (ख्मेर भाषेत: ក្រុងសៀមរាប) ही जागा सीम रिप प्रांताची राजधानी आहे. ही जागा उत्तर-पश्चिम कंबोडिया मध्ये आहे. ही एक लोकप्रिय फिरण्यासाठीचे शहर आहे आणि याला अंगकोर प्रदेशाचे प्रवेशद्वार मानले जाते.
सीम रिप स्थापत्य हे जुन्या फ्रेंच आणि चीनी-शैलीचा संगम आहे. जुनी बाजारपेठ आणि फ्रेंच क्वार्टरच्या भागात हे प्रामुख्याने पहायला मिळते. शहरामध्ये बघण्यासारखे बरेच काही आहे. उदा संग्रहालय, पारंपारिक अप्सरा प्रकारचे नृत्य प्रदर्शन, कंबोडियाचे सांस्कृतिक गाव, स्मरणिका आणि हस्तकला यांची दुकाने, रेशम कीड्यांचे शेत, भातशेतीचे. टोनल सॅप तळ्याजवळील पक्षी अभयारण्यदेखील भेट देण्यासारखे आहे.
आज सीम रिप लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यांमुळे पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देणारे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. कंबोडियातील सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षण असलेल्या अंगकोर मंदिराच्या जवळ असल्यामुळे हे शक्य झाले आहे.
सीम रिप
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!