सियाचीन हिमनदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या हिमनदीची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २२,००० फूट आहे. ह्या हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो. सियाचीन हिमनदीवर पाकिस्ताननेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे भारताने येथे कायमस्वरूपी चौकी स्थापन केली आहे. येथे भारताच्या व पाकिस्तानच्या लष्करांच्या नेहमी चकमकी होत असतात. सियाचीन हिमनदीवर अतिशय टोकाचे थंड हवामान असल्याने बरेचसे सैनिक तसल्या गोठवणाऱ्या हवामानामुळे मृत्युमुखी पडतात.
सियाचीन हिमनदी ही काराकोरम पर्वत रांगेमध्ये आहे. हिची एकूण लांबी ७० किमी इतकी असून ती काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिमनदी आहे व अध्रुवीय हिमनद्यांमध्ये लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची हिमनदी आहे.35.5°N 77.0°E / 35.5; 77.0. (सर्वात लांब अध्रुवीय हिमनदी ताजिकिस्तानची फेडचेंको हिमनदी आहे. तिची लांबी ७७ किमी इतकी आहे.) भारताने जवळपास ह्या हिमनदीच्या व मुख्य हिमनदीला मिळणाऱ्या सर्व उपहिमनद्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले आहे.
सियाचीन हिमनदी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.