तुर्तुक हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील एक हिमालयात वसलेले गाव एकआहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ भारताच्या सर्वात उत्तरेकडील गावांमध्ये याचा समावेश होतो. तुर्तुक हे लेह जिल्ह्यातील नुब्रा तालुक्यात श्योक नदीच्या डाव्या तीरावर आहे. भौगोलिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या हे गाव बाल्टिस्तान प्रदेशात येते. तुर्तुक आणि आसपासची पाच गावे वगळता आजचा बहुतेक बाल्टीस्थान प्रांत पाकिस्तानच्या अवैध अधिपत्या खाली येतो. १९७१ च्या बांग्लादेश स्वातंत्र्यसंग्रामा मध्ये भारतीय सैन्याच्या दुर्दम्य पराक्रमाने भारताने ही गावे आपल्या नियंत्रणात आणली . ही गावे बाल्टी लोकांची वस्ती असलेला भारतातील एकमेव प्रदेश आहे. तुर्तुक फळांसाठी विशेषतः जर्दाळूसाठी ओळखले जाते.
१९७१ च्या युद्धापर्यंत तुर्तुक पाकिस्तानच्या ताब्यात होते, त्यानंतर भारतीय सैन्याने गाव ताब्यात घेतले. हे सियाचीन ग्लेशियरच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे. साचा:OSM Location map
तुर्तुक बाल्टिस्तानच्या प्रदेशात आहे, हा प्रदेश जवळजवळ पूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तुर्तुक हे बाल्टी लोकसंख्येच्या पाच गावांपैकी एक आहे , इतर चार बोगडांग, त्याक्षी, चालुंखा आणि धोथांग आहेत. हे या गावांपैकी सर्वात मोठे आहे आणि श्योक व्हॅलीच्या दक्षिणेकडील चोरबाट विभागाची ऐतिहासिक राजधानी होती. बोगडांग हे 1948 पासून भारत प्रशासित लडाखचा भाग होते, तर इतर चार गावे 1971 च्या युद्धात भारतीय सैन्याने ताब्यात घेतली .
तुर्तुक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.