सिंह (तारकासमूह)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सिंह (तारकासमूह)

सिंह (Leo) हा एक तारकासमूह आहे. तो पूर्वेला कन्या आणि पश्चिमेला कर्क यांच्यामध्ये आहे. सिंह ही राशीचक्रातील एक राससुद्धा आहे. याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे. या तारकासमूहाला प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये काल्पनिक ग्रीक नायक हेरॅकल्स (ज्याला प्राचीन रोमन संस्कृतीमध्ये हर्क्युलिस म्हणत असत) याने हत्या केलेल्या नेमिअन सिंहाचे प्रतीक मानले जात होते. याचे चिन्ह (युनिकोड ♌) आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता. हा तारकासमूह त्याच्यातील अनेक प्रखर तारे आणि त्यांच्या सिंहासारख्या आकारामुळे सर्वात सहज ओळखता येणाऱ्या तारकासमूहांपैकी एक आहे. सिंहाची आयाळ आणि खांद्यांपासून एक आकार बनतो जो उलट्या प्रश्नचिन्हासारखा दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →