मकर (तारकासमूह)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मकर (तारकासमूह)

मकर हे आधुनिक ८८ तारकासमूहातील एक तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये ह्या तारकासमूहाचे नाव होते. ‘मकर’ला इंग्रजीमध्ये Capricornus (कॅप्रिकॉर्नस) म्हणतात. या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ शिंग असलेली शेळी किंवा शेळीची शिंगे असा होतो. याचे चिन्ह पुढीलप्रमाणे आहे (युनिकोड ♑). याला माशाचे शेपूट असलेल्या बोकडाच्या रूपामध्ये दर्शवले जाते. पॅन देवतेचे माशाचे शेपूट असलेल्या बोकडात रूपांतर होऊन या तारकासमूहाची आकृती बनली आहे, अशी पौराणिक समजूत आहे.

मकर क्रांतिवृत्तावर आहे. मकर तारकासमूहाची सीमा गरुड, धनु, सूक्ष्मदर्शी, दक्षिण मस्त्य, आणि कुंभ या इतर तारकासमूहांना लागून आहे. याचा १० बाजूंचा बहुभुजाकृती आकार विषुवांश २० ता ०६ मि ते २२ ता आणि क्रांति -१०° ते -२०° या मर्यादेत येतो. याचे खगोलावरील क्षेत्रफळ ४१४ चौरस अंश आहे. हा क्रांतिवृत्तावरील सर्वात लहान तारकासमूह आहे. हा तारकासमूह सप्टेंबरच्या उत्तरार्धात रात्री ९ च्या सुमारास मध्यमंडलावर येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →