सिंट मार्टेनव्(डच: Sint Maarten) हा कॅरिबियनमधील नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील एक घटक देश आहे. हा देश सेंट मार्टिन ह्याच नावाच्या बेटाच्या दक्षिणेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा उत्तरेकडील भाग सेंट मार्टिन ह्या फ्रान्स देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रांताने व्यापला आहे. २३ मार्च १६४८ रोजी ह्या बेटाचे दोन भाग करण्यात आले व फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले.
ऑक्टोबर २०१० पर्यंत नेदरलँड्स अँटिल्स नावाच्या देशाचा भाग असणाऱ्या सिंट मार्टेनला १० ऑक्टोबर २०१० रोजी स्वायत्तता व देशाचा दर्जा मिळाला.
सिंट मार्टेन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.