सावन कुमार टाक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सावन कुमार टाक

सावन कुमार टाक (९ ऑगस्ट १९३६ - २५ ऑगस्ट २०२२) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार होते. साजन बिना सुहागन, सौतन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा या यशस्वी चित्रपटांसह त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. संजीव कुमार आणि मेहमूद ज्युनियर सारख्या अभिनेत्यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण देण्याचे श्रेय त्यांना जाते. राजेश खन्ना अभिनीत सौतन (१९८३) हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकीय उपक्रम होता, जो मॉरिशसमध्ये चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. ह्यातील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का गीत है" ह्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.

त्यांचा विवाह संगीतकार उषा खन्ना यांच्या सोबत झाला होता; पण नंतर ते वेगळे झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →