इंद्र कुमार

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इंद्र कुमार (जन्म: इंद्र इराणी ) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्यांना पाच फिल्मफेर नामांकने मिळाली होती, तसेच त्यांनी अनेक गुजराती भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचा नवीनतम चित्रपट ' थँक गॉड' (२०२२) आहे.

कुमार यांनी दिल (१९९०) या चित्रपटातून दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर त्यांनी बेटा (१९९२), राजा (१९९५) आणि इश्क (१९९७) या वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित नाट्य चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हे चारही चित्रपट संबंधित वर्षांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि समीक्षकांच्या दृष्टीने तसेच व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले. त्यांना बेटा आणि राजा या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेर पुरस्कार नामांकन मिळाले. त्यानंतर त्याचे अनेक सरासरी कमाई करणारे किंवा व्यावसायिक अपयश मिळालेले चित्रपट बनवले जसे; मन (१९९९), आशिक (२००१), रिश्ते (२००२). कुमारने त्यानंतर डबल धमाल (२०११), ग्रँड मस्ती (२०१३) आणि टोटल धमाल (२०१९) यासारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी विनोदी चित्रपटांचे सिक्वेल बनवले. नंतरचा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये गणला जातो आणि आजपर्यंतचा त्यांचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →