सबिता इंद्रा रेड्डी (जन्म ५ मे १९६३) एक भारतीय राजकारणी आहे ज्या २०१९ पासून तेलंगणा राज्याच्या शिक्षण मंत्री आहेत. रेड्डी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरुवात केली आणि २००९ मध्ये आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला गृहमंत्री बनल्या व २०१४ हे पर्यंत काम केले. यापूर्वी त्यांनी २००४ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशच्या खाण आणि भूविज्ञान मंत्री म्हणून काम पाहिले होते.
रेड्डी तीन वेळा आंध्र प्रदेशच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्या आहे, दोन वेळा चेवेल्ला विधानसभा मतदारसंघातून (२००० व २००४ मध्ये) आणि एकदा महेश्वरम मतदारसंघातून (२००९ मध्ये). २०१८ पासून, त्यांनी तेलंगणा विधानसभेत महेश्वरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि २०१९ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये त्या सामील झाल्या.
सबिता इंद्रा रेड्डी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.