सारांश (चित्रपट)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सारांश हा १९८४ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी नाट्यपट आहे, ज्यात अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी, मदन जैन, निळू फुले, सुहास भालेकर आणि सोनी राजदान यांनी भूमिका केल्या होत्या. हे मुंबईत राहणाऱ्या एका वृद्ध महाराष्ट्रीय जोडप्याबद्दल आहे (खेर व हट्टंगडी) जे त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या निधनाचे दुःख सहन करत आहे जो परदेशात राहत होता. अनुपम खेर यांचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला अजित वर्मन यांचे संगीत आणि वसंत देव यांचे गीत होते. त्याची निर्मिती आणि वितरण राजश्री प्रॉडक्शनने केले होते. १९८५ च्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत नोंद म्हणून त्याची निवड झाली; पण त्याला नामांकन मिळाले नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →