सारस क्रौंच

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सारस क्रौंच

सारस क्रौंच अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा क्रौंच आढळून येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडीदार पसंत करतो. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान, उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे तसेच भातशेतीचे प्रदेश याचे आवडते स्थान आहे.

जगभरात आढळणाऱ्या १५ क्रोच प्रजातींपैकी सहा प्रजाती भारतात आढळून येतात. सारस हा यापैकीच एक.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →