तांबट (शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्त्व लक्षात येते.
याचे पुकपुक्या असे स्थानिक नावही काही ठिकाणी आढळते.
महाराष्ट्रातील अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून तांबट पक्ष्यांची निवड झाली आहे...
तांबट (पक्षी)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!