कुटूरगा ( सयलोपोगॉन झेलेनिनिकस ) ही भारतीय उपखंडात आढळणारी आशिआई बार्बेट प्रजाती आहे. या पक्ष्याचा अधिवास उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय जंगलामध्ये आढळून येतो . हा पक्षी नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांमधील तराईपासून श्रीलंका पर्यंत सर्वत्र आढळून येतो आणि आययूसीएन रेड लिस्टमध्ये कमीतकमी कन्सर्न्स म्हणून सूचीबद्ध आहे. कुटूरगा झाडावर आढळून येणारी आणि फळे व कीटक खाणारी प्रजाती आहे. ते झाडामध्ये गोलाकार भोक पाडून त्यात घरटे करतात. मादी एका वेळी 2-4 अंडी घालते . हे आंबा, पपई, केळी, वड, उंबर अशा झाडांची फळे खातात
प्रौढ पक्ष्याचे डोके, मान आणि छाती तपकिरी रंगाची असते आणि डोळ्याच्या भोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ असते. उर्वरित पिसारा हिरवा असतो. त्याचा कुटूर्रर... कुटूर्रर...असा आवाज असतो.
कुटूरगा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.