आफ्रिकन मोर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आफ्रिकन मोर

आफ्रिकन मोर किंवा काँगो मोर (वैज्ञानिक नाव:Afropavo congensis), ही आफ्रिकेच्या कांगो खोऱ्यातील मूळ मोराची एक प्रजाती आहे. ही जगातील तीन मोर प्रजातींपैकी एक आहे आणि आफ्रिकेतील मूळ पाव्होनिना उपकुटुंबातील एकमेव सदस्य आहे. या जातीची आय.यू.सी.एन. लाल यादी मधील असुरक्षित प्रजाती वर्गात नोंद करण्यात आली आहे.

डॉ. चॅपिन यांच्या निरीक्षणानुसार मूळ काँगोलीज लोक आपल्या डोक्यावर लांब लाल-तपकिरी पिसे लावत असत जी चॅपिन यांना माहित असलेल्या पक्ष्यांच्या कोणत्याही प्रजातीत दिसून येत नव्हती. नंतर, चॅपिन यांनी मध्य आफ्रिकेच्या रॉयल म्युझियमला भेट दिली आणि 'भारतीय मोर' असे लेबल असलेले समान पिसे असलेले दोन नमुने पाहिले. यावरून त्यांनी काँगो मोर, पूर्णपणे भिन्न प्रजाती असल्याचे नोंदवले. इ.स. १९५५ मध्ये चॅपिन यांना या प्रजातींचे सात नमुने शोधण्यात यश मिळाले. काँगो मोरात मोर आणि गिनीफॉल या पक्षांची शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे ही प्रजाती दोन कुटुंबांमधील दुवा असल्याचे मानण्यात येते.



या प्रजातीच्या नराची लांबी ६४–७० सेंमी (२५–२८ इंच) पर्यंत मोठी आढळते. ही लांबी त्याच्या भारतीय मोर या चुलत भावांपेक्षा खूपच कमी आहे. यातील नराचे पंख धातूच्या हिरव्या आणि जांभळ्या छटासह गडद निळे आहेत. त्याला उघड लाल मानेची त्वचा, राखाडी पाय आणि चौदा शेपटीची पिसे असलेली काळी शेपटी आहे. त्याचा मुकुट उभ्या पांढऱ्या लांबलचक केसांसारख्या पंखांनी सजलेला आहे. मादी (लांडोर) ची लांबी ६०–६३ सेंटीमीटर (२४–२५ इंच) पर्यंत आढळून येते आणि सामान्यत: काळ्या उदर, धातूचा हिरवा पाठ आणि एक लहान चेस्टनट तपकिरी शिखा असलेला तांबूस पिंगट तपकिरी पक्षी आहे. ही प्रजाती अपरिपक्व आशियाई मोर असल्या सारखे दिसतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →