ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य

ईगलनेस्ट अभयारण्य हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे ईशान्येस सेसा ऑर्किड अभयारण्य आणि पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडील पाके व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. हे अभयारण्य कामेंग हत्ती प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य समुद्रसपाटीपासून ५०० मीटर (१,६४० फूट) ते ३,२५० मीटर (१०,६३३ फूट) इतक्या उंचीवर आहे.

ईगलनेस्ट अभयारण्य तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक विलक्षण प्रजाती, त्यांच्या संख्या व त्यांना पाहता येण्याची सुलभता यामुळे अतिशय महत्त्वाचे पक्षी निरीक्षणाचे स्थळ आहे.

भारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला १९५० मध्ये या प्रदेशात तैनात करण्यात आले होते, त्यावरून याचे नाव ईगलनेस्ट असे पडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →