पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे.
कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे,ससे इत्यादी प्राणीही आढळतात.
हे अभयारण्य रायगड जिल्हयात पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६२ कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात.
कर्नाळा पक्षी अभयारण्य
या विषयातील रहस्ये उलगडा.