किनवट किंवा पैनगंगा अभयारण्य हा यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ किमी२ इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे.
या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव), पांढरकवडा यांचे देखरेख व थेट नियंत्रण आहे.
१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन, मोहा, साग, साजड, सूर्या, हलदू इत्यादी अनेक वृक्ष आहेत.
अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती आहेत.
कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर, चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण, इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात, असे सांगितले जाते. ह्या प्राण्यांची शिकार करूनच बिबटे, रानकुत्रे इत्यादी श्वापदेही इथे राहत असावेत.
साप : या अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, वगैरे साप आहेत.
पैनगंगा अभयारण्यातले पक्षी :-
अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, घनवर किंवा हळदी कुंकू(स्पॉटबिल बदक), जकाना, पॉंड, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन इत्यादी.
पैनगंगा वन्यजीव अभयारण्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?