टिपेश्वर अभयारण्य

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत पसरलेला भाग आहे. या जंगलात असलेल्या टिपाई देवीच्या मंदिरावरून या अभयारण्यास टिपेश्वर नाव पडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदी खोऱ्यात टिपेश्वर अभयारण्य पसरले आहे.

(७८° ३५' पूर्व ते ७८° २०' पश्चिम आणि २०° ००' उत्तर ते १९° ३५' दक्षिण)

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील



पांढरकवडा गावापासून सुमारे फक्त २० कि.मी. अंतरावर,

यवतमाळहून ९२ कि.मी. अंतरावर, तर

आदिलाबादपासून ४२ कि.मी. अंतरावर हे अभयारण्य पसरलेले आहे.

दि. ३० एप्रिल १९९७ च्या अध्यादेशानुसार १४८.६२ चौ. कि.मी. क्षेत्राला टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले.



या अभयारण्याचे संचालन मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पेंच राष्ट्रीय उद्यानचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक करतात.

अभयारण्य क्षेत्रात टिपेश्वर, मारेगांव आणि पिटापुंगरी अशी तीन गावे येतात.

या अभयारण्यात इंग्रजांच्या काळातील एक छोटेसे विश्राम गृह आहे. एक निसर्ग वाचन/अभ्यास केंद्रही येथे सुरू करण्यात आलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →